१४ मार्च २०१५
प्रत्येकी खर्च २२० रु.
गडाचा प्रकार- वनदुर्ग
Water available throughout the year (many hidden tanks & cisterns)
मार्च चा महिना चालू होत. पहाटेच्या ३.४० वाजता मला निखिल चा फोने आला, " अरे देवव्रत, बोरीवलीला वीजा कडाडून पाऊस पड्तोय. आपल जायच नक्की आहे ना ? ". माझी झोप खाडकन उडाली. मार्च मध्ये पाऊस कसा शक्य आहे ? तरी त्याला म्हणालो " दादरला पोहोच, पुढचं काय ते बघु ". आम्हाला ४.४३ ची खोपोली लोकाल पकडायची होती. मी ४.२० ला घर सोडणार इतक्यात दादर ला देखील पावसानं हजेरी लावली. ठरवल्या प्रमाणे फलाट क्रमांक १ वर भेटलो व आजची रात्र सुधागडावर काढायचा निर्णय घेतला.
कर्जतला पोहोचे पर्यंत पाऊस चालू रहिला. वाटेत मलंगगड, चंदेरी, महिसमाळ, नाखिंड, पेब व माथेरान चे दर्शन झाले. अगदी नाखिंड चे नेढे देखील पुसट का होइना दिसत होते. अडीच तासांच्या प्रवासानंतर ट्रेनने खोपोली स्थानक गथले. आमची पाली ची ST उभीच होती. गाडीने महामार्ग गाठल्यावर दूरवर एका बाजुला प्रबळगड, इर्शाळगड व दुसर्या बाजुला ड्युक्स नोस ने दर्शन दिले. पाऊण तासाच्या प्रवासानंतर सरसगडाचे भव्य कातळ दिसू लागले. त्यावरून कळाले कि पाली गाव काही मिनिटावररच आहे आणि काही क्षणातच ST गावात शिरली. गाडीतून उतरल्यावर पहिली नझर पडते ती सरसगडावर. बाल्लालेश्वर गणपतीचा रक्षणकर्ता- असेच म्हणता येईल. दोन वर्षापूर्वी पालीला आलो होतो तेव्हाच सरसगड चढलो होतो. ह्यावेळी लक्ष्य होते ते सुधागाडाचे, आणि त्यासाठी पहिले पाउल म्हणजे ठाकूरवाडी ला पोहोचणे. सुधागडला आपण 'सुधागड' म्हणतो. पण इथे त्याचे नाव 'भोराईचा किल्ला' अथवा 'भोरपगड'- असे बस थांब्यावरील एका काकांशी बोलताना समजले.
सकाळी घरातुन निघताना पावसाने हादरवले होते. पण पाली जवळ पाऊस आला सुद्धा नाही आणि ठाकूरवाडीला पोहोचता पोहोचता उन्हाचा पारा आकाशाला भिडला होता. अशा १२.०० वाजताच्या उन्हात आमची चढाईला सुरुवात झाली. सुरुवातीचा पट्टा ridge वरून आहे. पाऊण तासात आम्ही पाच्छापूर दरवाझा गाठला. पहिल्या बुरुजापर्यंत सावली नाही पण एक छानस, कातळात खोदलेल पाण्याचं टाकं आहे. इथुन थोडं पुढे गेल्यावर कवनी चा डोंगर व खाली ठाकूरवाडी गाव दिसते. इथे आम्हाला Crested Serpent Eagle दिसला.
गडावर एक भव्य पठार आहे. डाव्या बाजुला जुन्या, पडक्या वाड्याचे बरेच अवशेश आहेत. जवळच एका ताळ्या च्या बाजुला जुने शिव मंदीर आहे. आमची फोटोग्राफी चालू होतीच पण आता ३.०० वाजले असल्यामुळे आता भुकेची जाणीव होत होती.
गडावर पाणी तसे आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसले (जरा शोधावे लागले). जुन्या वाड्या पासून, जवळच थोड्या अंतरावर ३ मोठे हौद आहेत. तिथे पोहोचायला थोडं अंतर उतरावे लागते. उजव्या बाजूच्या टाक्यात गढूळ पाणी होते. त्या मानाने डाव्या बाजूचे टाके साफ होते, पण पाण्या पर्यंत पोहोचणे कठीण होते. एका Coca-Cola च्या २.५ Ltr बाटलीला रोप लावून टाक्यातून पाणी काढले.
संध्याकाळी अंघोळ करून भोराईदेवीच्या मंदिरात मुक्कामाला गेलो. गडावर जेवण म्हणजे अर्थातच Maggi. मंदिरात आम्ही तिघ्यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणाही नव्हते. रात्री ८.०० - ९.०० च्या सुमारास दूरवर Head lamps दिसले. आम्हीही signal दिला. एकूण चौघेजण होती. आणी त्यातला एकजण माझा मित्र निघाला- नितीश बापट. आम्ही तिकोना किल्ल्यावर एकत्र गेलो होतो. मग काय तर, रात्रीच्या २ वाजेपर्यंत गप्पा-गोष्टी रंगल्या. Star gazing हि भरपूर केल.
सकाळी आरामात ८.०० वाजता उठलो, पटापट बाटल्या भरल्या अन bag-pack करून धोंडसे गावाकडे निघालो. रस्ता तसा पालापाचोळ्याने भरला होता. बहुतेक जास्त वापरात नसावी ही पायवाट. या वाटेने जाताना जो महा-दरवाजा आहे तो हुबेहूब रायगड किल्ल्या सारख्या पद्धतीचा, म्हणजेच हस्ती-नखाच्या आकाराचा आहे. या दरवाजाच्या बाहेरील भागाला "जिभी" असे म्हणतात. या रचनेचे वैशिष्ट्य असे- शत्रूच्या हत्तीला जास्त जागा मिळत नाही (दरवाजाला धडक द्यायला).
या वाटेत मोठाले boulders असल्याने आमचा pace थोडा कमी झाला होत. पण एकदा का तो डोंगर उतरलो, त्यानंतर धोंडसे गाव पटापट गाठलं. वाटेत पिण्याच्या पाण्याचे बरेच sources सापडले.
धोंडशावरून आम्हाला २.०० ची एस.टी मिळाली, पाली गाठले अन पाली वरून खोपोली मार्गे पनवेलची एस.टी मिळाली आणि ७. ३० PM पर्यंत घरीही पोहोचलो.

No comments:
Post a Comment